स्पर्धा परीक्षा- आजची वस्तुस्थिती 
|| Competitive Exam - Fact today ||


     सरकारी नोकरी मिळवणं हे अनेक मध्यमवर्गीय मुलांचं स्वप्नं असते. स्पर्धा परीक्षा हा त्यासाठीचा राजमार्ग आहे. योग्य मेहनत आणि चिकाटी याच्या जोरावर त्यात यश मिळवता येऊ शकतं, या लेखच्या रुपाने पालक व विद्यार्थ्यांपर्यंत विविध परीक्षांची माहिती देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न.
     करिअर निवड हा प्रत्येक विद्यार्थी व पालकांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि म्हणूनच जोखमीचा निर्णय असतो. कारण तुमच्या या दुरदृष्टीच्या निर्णयावरच नुसते बौद्धीक समाधानच नव्हे, तर सुरक्षित जीवनाची मदार असते. कारण तुमच्या या दुदृष्टीच्या निर्णयावरच नुसते बौद्धीक समाधानच नव्हे, तर सुरक्षित जीवनाची मदार असते. महाराष्ट्राच्या संदर्भात विचार केला तर, स्पर्धापरीक्षांना आवश्यक असणारी गुणवत्ता येथील विद्यार्थ्यांत काठोकाठ भरली आहे हे जाणवते. फक्त योग्य माहितीची कमतरता आणि पात्रतेच्या निकषांबद्दलचे अज्ञान त्यांना या प्रवाहापासुन दुर ठेवते. विशेषतः पदवी नंतर हे  विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचीर तयारी करायला सुरुवात करतात आणि हेच त्यांच्या अपयशाचे प्रमुख कारण ठरते. पूर्वतयारीकरिता आवश्यक असणारा पुरेसा अवधी न दिल्याने पुन्हा पुन्हा अपयशाची पुनरावृत्ती होते आणि आत्मविश्वास ढासळतो.
     स्पर्धा परीक्षा ती राज्य पातळीवरची असो किंवा देश पातळीवरची, एकुणच स्पर्धकांची संख्या प्रचंड प्रमाणता वाढत आहे आणि वाढत राहणार, त्यासाठी योग्य नियोजन आणि अपेक्षित वेळ तयारीसाठी देणे गरजेचे आहे. या सर्व प्रक्रियेत सुरुवात खुप महत्वाची आहे. सुरुवात जर चुकली तर पुढील सर्व गोष्टी आपोआप चुकतील. कधीतरी हे लक्षात येईल पण तोपर्यंत वेळ आणि पैसा वाया जावूनही हाती काही  लागणार नाही याची काळजी पालकांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावी. जसे आपण शर्ट घालतांना जर पहिले बटन चुकीच्या ठिकाणी लावले तर पूढील सर्व बटनांची जागा आपण आपोआप चुकवतो. शेवटचे बटन लावतांना हे आपल्या लक्षात येतं. शर्टच्या बाबतीत आपले दोन तीन मिनिटे वाया गेल्याचेही दुःख आपणास होते, पण करिअरच्या बाबतीत असे होताना कामा नये.
     शहरी भागातील कितीतरी पालक व विद्यार्थी पदवी नंतर खाजगी नोकरीत अडकतात, ती तात्पुरती त्या वेळेची कदाचीत गरजही असेल, पण तय चक्रव्युहात एकदा का आपण अडकलो तर बाहेर पडणे कठिण होते, जेव्हा हे आपल्या लक्षात येते, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, नोकरीही सोडता येत नाही आणि तयारीला वेळीही देता येत नाही. शॉर्ट गेन च्या नादात आपण लाँग पेन स्विकारत असतो, आयुष्यातील सर्वात एनरजेटिक काळ आपण खाजगी नोकरीला देतो. त्यापेक्षा शॉर्ट पेन स्विकारा व लाँग गेनचा विचार करा. पदवीच्या आधीच खुप मेहनत घ्या (कमीत कमी 1 किंवा 2 वर्ष)  आणि पदवीनंतर लगेचच चांगली सरकारी नोकरी पदरात पाडून घ्या. संधी अनेक आहेत, आपण निर्णय घेत नाही. निर्णय घेतांना काही अडचणी असतील तर आमची मदत घ्या. योग्य माहिती आपणास योग्य वेळी मिळाली तर त्यानुसारच आपण विचार करतो. आपले विचारच आपल्याला योग्य शिक्षणापर्यंत पोहचवितात आणि आपले शिक्षणच आपले करिअर निवडण्यात मदत करीत असते. ही साखळी समजून घ्या.
     बरेच पालकांचा एकच सुर असतो. आम्हाला कोणी योग्य वेळी माहितीच दिली नाही, जर माहिती वेळेवर मिळाली असती तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती. अर्थातच आता भूतकाळाला दोष देण्यात वाया घालवण्यापेक्षा वर्तमान काळाला समजुन घ्या. मुलांना निर्णय घेण्यात मदत करा, तरच तुमचा व तुमच्या पाल्याचा भविष्यकाळ चांगला असेल या तीळमात्रही शंका नाही.
     आणि शेवटी जाता जाता, त्या क्षेत्रात स्पर्धा कमी आहे म्हणजेच स्पर्धक कमी आहेत अशा क्षेत्रांचा जाणीवपूर्वक विचार करावा. जसे स्टेनोग्राफी, बर्‍याच जणांना असं वाटतं की संगणकाच्या युगात स्टेनोग्राफीचे महत्व कमी झाले असेल, पण खालील माहिती वाचल्यावर तुमचे मत निश्चित बदलेल यात शंका नाही.
     स्टेनोग्राफरच्या आजही केंद्रात, राज्यात, हायकोर्टात सतत जागा निघत असतात. 2013 मध्ये मुंबई हायकोर्टात शिपाई, लिपीक व स्टेनोच्या जागा भरल्या गेल्या, लाखोंच्या संखेने अर्ज शिपाई व लिपीक पदासाठी आले. पण स्टेनोच्या जेवढ्या जागा भरावयाच्या होत्या तेवढेही अर्ज संपूर्ण मुंबई ठाण्यातून आले नाहीत हे मुद्दामहून येथे नमुद करावेसे वाटते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने स्टेनोग्राफी करावे पण ज्यांनी मराठी, इंग्रजी टायपिंग केले असेल तर त्यांनी स्टेनाग्राफी करायला काय हरकत आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी मराठी व इंग्रजी स्टेनोग्राफी 80 ते 100 च्या परीक्षा द्याव्यात, तुम्ही घेतलेली मेहनत निश्चित वाया जाणार नाही याची मी हमी देतो. स्टेनोग्राफरसाठी केंद्रात गे्रड डी व सी च्या परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून दरवर्षी घेण्यात येतात. शिवाय या परिक्षेत अंकगणिताचा समावेश नसतो.

Post a Comment

أحدث أقدم