पोलीस भरतीची लगबग
नोकरीतील जागा वाढल्यात की, परीक्षार्थ्यांची संख्या वाढते आणि संखाया वाढली की, परीक्षेतील चुरस वाढते, हे आपल्याकडे नेहमीच पहायला मिळते. रेल्वेत एक लक्ष जागा घोषित झाल्या तेव्हा सुमारे साडे चार कोटी उमेदवारांनी अर्ज केल्याचे सांगितले गेले. अशीच एक भरती डॉ.मनमोहन सिंगांच्या काळात बँकांमध्ये झाली होती, तेव्हा बँकेला सलग चार महिने तीन शिफ्टमध्ये परीक्षा घ्याव्या लागल्या होत्या. आर.आर.पाटील गृहमंत्री असतांना सलग तीन वर्षे अशाच जागा निघाल्यात. त्यावेळीव वीस लागखाहून अधिक उमेदवार स्पर्धेत असल्याच्या बातम्या झळकत होत्या. अताची परिस्थिती तर फारच वेगळी आहे. यावेळी किती मुले-मुली पोलीस भरतीला उपस्थित राहतील, याचा अंदाजही करवत नाही.
ग्राऊंड हाऊसफुल
पावसाळा सुरु आहे. त्यातच लॉकडाऊनसुद्धा आहे. असे असूनही जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या पोलीस ग्राऊंडवर शारीरिक चाचणीची तयारी करणार्या उमेदवारांची गर्दी वाढतानाच दिसते. तालुका आणि ग्रामीण भागातही तरुण-तरुणी गावालगतच्या रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ धावतांना दिसतात. सकाळी धावणार्यांची संख्या अधिक असते. ही सर्व मुले स्वतःला शारीरिक चाचणीला फीट ठेवण्यासाठी आतापासूनच कामाला लागलीत. खरे तर, ही आनंदाची बाब आहे.
काय करायला हवे ?
ठाकरे सरकारने सुरुवातीलाच लेखी परीक्षा आधी घेण्याचे सुतोवाच केलेले होते. खरे तर, ते संयुक्तिकही होते. एकदम लाखो उमेदवारांना ग्राऊंडवर शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यापेक्षा लेखी परीक्षेत अव्वल असलेल्या मोजक्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्याने उन्हातान्हात तरुणांना होणारा त्रास वाचतो. त्यांच्या होणार्या हालअपेष्टा थांबविता येतात. सामान्यपणे हीच पद्धत इतर आयोगातही वापरली जाते. सशस्त्र दलात काही अपवाद आढळतात, परंतु मोठ्या भरतीच्या वेळी हीच पद्धत संयुक्तिक ठरते. परंतु महाराष्ट्रात याला विरोध झाला. भरती होण्यापूर्वीच लॉकडाऊन झाले. आता शासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कोरोनाकाळात आधी लेखी परीक्षा होण्याची शक्यता अधिक वाटते. मुलांची गर्दी टाळणे आणि योग्य नियोजनाच्या दृष्टीने ते सोयीचे ठरेल. याचा अंदाज तरुणांना आला असावा म्हणून त्यांनी लेखी परीक्षेच्या तयारीला सुद्धा सुरुवात केल्याचे दिसते.
अभ्यास कसा कराल ?
लेखी परीक्षेत पोलीस विभागाचे सामान्यज्ञान, जिल्हावर माहिती, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, या विषयांवर प्रश्न विचारण्यात येतात. साधारणतः प्रत्येक विषयांवर सारख्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. यासंबंधित संभाव्य प्रश्नपत्रिका आपण ‘आहिल्स लर्निंग झोन’ या युट्यूब चायनलवर देत असतोच. सराव प्रश्न पत्रिका सोडवून पहाव्यात. प्रश्नपत्रिका सोडूवन पाहिल्याशिवाय स्वतःच्या अभ्यासाची खोली कळत नाही. विचारलेल्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करुन त्यानुसार करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या परीक्षेचा पाया 6 वी ते 10 वी च्या इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, विज्ञान या विषयांवरच आधारलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शालेय पुस्तकांवरच भर देणे अपेक्षित असते. याशिवाय, दररोज एक वृत्तपत्र व नियमित सह्याद्री चॅनलेवरील बातम्या पहाव्यात.
टिप्पणी पोस्ट करा