पोलीस भरती स्वरुप व अभ्यासक्रम



शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा

शारीरिक परीक्षा ही पुरुषांसाठी व महिलांसाठी 100 गुणांची  असते. या परीक्षेत 50% किमान गुण उत्तीर्ण होण्यासाठी मिळवणे आवश्यक असते.

पुरुषांसाठी शारीरिक चाचणी (100 गुणांची विभागणी)


1) 1600 मीटर धावणे

20 गुण

2) 100 मीटर धावणे

20 गुण

3) गोळाफेक

(16 पौंड वजनाचा)- 20 गुण

4) लांब उडी

20 गुण

5) पुल अप्स (10 पुल अप्स काढणे)-

20 गुण

उमेदवारांनी वर दिलेल्या 5 प्रकारांचा (शारीरिक चाचणीमधील) काळजीपूर्वक सराव करुन त्यामध्ये चांगले गुण मिळवावेत.

पुरुष पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचण्या

     शारीरिक चाचणीमध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी शारीरिक कवायत शिक्षकांचे/खेळाडूंचे जरुर ते मार्गदर्शन घेऊन किमान एक महिना अगोदर सराव करण्याची आवश्यकता आहे. असा सराव करताना टायमिंग/मोजमापे दररोज नोंद करुन ठेवावीत व त्यामध्ये अपेक्षित सुधारणा घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. असा सराव फक्त सकाळी किंवा सायंकाळी करुन चालत नाही. कारण प्रत्यक्ष अशी शारीरिक चाचणी ही परीक्षेच्या दरम्यान सकाळी, दुपारी (उन्हातही) घेतली जात असल्याने दुपारीसुद्धा सराव करण्याची आवश्यकता आहे.

     भरतीच्या ठिकाणी उमेदवारांची सकाळी/दुपारी/संध्याकाळी अपवादात्मक परिस्थिती रात्रीसुद्धा मैदानी चाचणी परीक्षा घेतली जाते म्हणून उमेदवारांनी सकाळी अथवा संध्याकाळीच मैदानी चाचणीचा सराव न करता वेळ असेल तर दुपारीसुद्धा सराव करुन, शारीरिक क्षमतेची/वेळेची नोंद घेणे आवश्यक आहे.

     दुपारच्या वेळेत धावणे, अडथळे पार करणे, लांब उडी यामध्ये थकवा येऊन अपेक्षित गुण मिळण्याची संधी कमी होते व इतर उमेदवारांमध्ये स्पर्धेतून मागे पडण्याची प्रक्रिया येथेच सुरु होते. हे टाळण्यासाठी दिवसातील तीनही वेळात (सकाळ, दुपार, सायंकाळ) शारीरिक चाचणीची तयारी (सराव) करावी. अशी तयारी करण्यासाठी शाळेचे मैदान, क्रिडा, मैदान, रनिंग ट्रॅक किंवा पोलीस मैदानाचा वापर करावा व तेथे जरुर ते मार्गदर्शन घ्यावे.

     ग्रामीण भागातील उमेदवारांना अशी मैदाने उपलब्ध होत नाहीत. त्यासाठ त्यांनी आपल्या गावाजवळचा रस्ता व तेथे अंतर मोजून घड्याळाची वेळ लावून सराव करावा.

     शक्य असल्यास पात्र उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या अगोदर एक ते दोन दिवस जिल्हा पोलीस मैदानावर जाऊन सराव करावा. तेथे पपोलीस कवायत प्रशिक्षक त्यांना सरावाचे वेळी मार्गदर्शन करण्यास उपलब्ध असतात. या संधीचा लाभ सर्व उमेदवारांनी घेतल्यास चांगले/ अधिक गुण मिळविता येतात.

  1)  पुरुष उमेदवार 1600 मी. धावणे- गुण 20

अंतर

मिळवणारे गुण

4 मि.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी

20 गुण

4 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मि.10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी

18 गुण

5 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मि.50 सेकंद किंवा त्यापेक्षा

कमी16 गुण

5 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मि.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी  

14 गुण

5 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि.10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी

12 गुण

 

6 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि.30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी  

10 गुण

6 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मि.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी   

6 गुण

6 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मि.10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी

02 गुण

7 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त

000 गुण

 


2) 100 मीटर धावणे (20) गुण-

     या प्रकारात जास्त गुण मिळविण्यासाठी शर्यतीच्या सुरुवातीला वेगवान सुरुवात (Bullet Start) करणे, शर्यतीच्या अंतिम टप्प्यात वेग कमी न करणे, पळताना हात जोरात स्विंग करणे, तसेच मागे अथवा इकडे तिकडे न पाहणे- हे आवश्यक आहे. धाव पूर्ण होताच न चुकात परीक्षकाकडे जाऊन आपली वेळ अचूक नोंदविली आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे. अचूक वेळ स्टॉप वॉच लावून दररोज सराव करावा. उमेदवारास दुपारी भर उन्हात धावण्याची चाचणी द्यावी लागते. त्यामुळे उमेदवारांनी केवळ सकाळी किंवा संध्याकाळी धावण्याचा सराव करु नये. भर उन्हातील सराव उमेदवारांना चाचणीच्या वेळी फायद्याचा ठरतो.

अंतर

मिळणारे गुण

11.50 सेकंद किंवा त्याच्या आत

20

11.50 ते 12.50 सेकंदाच्या आत

18

12.50 ते 13.50 सेकंदाच्या आत

16

13.25 ते 14 सेकंदाच्या आत

14

14 ते 14.75 सेकंदाच्या आत

12

 3) गोळाफेक (20 गुण) - Shot Putter

     उमेदवार जेवढे लांब अंतर फेकतो त्या प्रमाणात त्याला गुण दिले जातात. कमी अंतरावर गोळा फेकल्यास कमी गुण मिळतात. या प्रकारात 20 पैकी 20 गुण मिळविण्यासाठी 8.50 मीटर लांब गोळा फेकला पाहिजे. त्यानंतरच्या प्रत्येक 50 सें.मी. कमी लांब फेकल्यास 2 गुण कमी होतात. याबात माहिती खालीलप्रमाणे-

गोळा फेकलेले अंतर

मिळालेले गुण

8.50 मीटर

20

7.50 मीटर

16

7.00 मीटर

14

6.00 मीटर

12

 गोळाफेक मध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. पुरुष उमेदवारांसाठी गोळ्याचे वजन 16 पौंड (8 कि.ग्रॅ.) असते. हा गोळा खेळाचे साहित्य मिळणार्‍या कोणत्याही दुकानात माफक किंमतीला उपलब्ध असतो. गोळाफेकीमध्ये हात व शरीराचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी किमान सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शकाची जरुरी आहे. गोळाफेक दिलेल्या वर्तुळातूनच करावी लागते. त्या वर्तुळास अथवा वर्तुळाबाहेर पाऊन पडल्यास फाऊल दिला जातो व गुण मिळत नाहीत.

4) लांब उडी (20 गुण) - 

     या प्रकारात 20 पैकी 20 गुण मिळविण्यासाठी किमान 5 मीटर लांब उडी मारणे आवश्यक आहे. त्यानंतरच्या प्रत्येक 50 सें.मी. कमी उडीच्या अंतरास 2 गुण कमी होतात. याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे- 

अंतर

मिळणारे गुण

5.00 मीटर

20

4.50 मीटर

16

4.75 मीटर

18

4.25 मीटर

14

4.00 मीटर

12

     लांब उडीत चांगले गुण मिळविण्याची संधी असते तथापि निर्धारीत रेषेवर पाय पडून ‘फाऊल’ (सदोष उडी) घेण्याची जास्त शक्यता असते. तेथे फक्त एकच वेळ सदोष उडी माफ केली जाते. म्हणून उमेदवाराने निर्धारीत रेषेला स्पर्श न करता लांब उडी मारण्याचा सराव करावा. लांब उडी मरताना पाय लचकरणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लांब उडी मारण्यासाठी तयार केलेल्या खड्डयात बारीक वाळू (खसवा किंवा भुसभुशीत माती) असणे आवश्यक आहे.

5) पुल अप्स् (20 गुण)-

     पुलअप्स म्हणजे आडव्या फळीला दोन्ही हातांनी लोंबकळून त्या फळीला दोन्ही दंडातील ताकदीने छाती टेकवायची व पाय न झाडता, पुन्हा हात सरळ करायचे. पोलीस मैदानी चाचणीतील हा सर्वात सोपा व पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा प्रकार. यास 20 गुण असतात. एका पुलअप्सला 1 गुण मिळतो. जेवढे जास्त पुलअप्स तेवढे जास्त गुण, मात्र कमाल गुण मर्यादा 20. 

पुलअप्स  

मिळणारे गुण

10

0

9

16

8

12

7

8

6

4

5

2

          पुल अप्स चाचणीमध्ये हनुवटी ही लाकडी पट्टीच्या वरील टोकास चिकटविणे आवश्यक असते. तसेच उमेदवाराचे दोन्ही पाय सरळ रेषेत असणेही तितकेच आवश्यक असते. दोन्ही पाय एकत्र ठेवूनच उमेदवारास 10 पुल अप्स् काढावे लागतात. सराव करुन हे शक्य होऊ शकते.

Post a Comment

أحدث أقدم